प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य संघटकपदी विभागीय संपादक अनिल राठोड
(आत्ताच एक्सप्रेस या वृत्तपत्राचे विभागीय संपादक)
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

यवतमाळ:- (दिनांक ९ जानेवारी) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य संघटकपदी दैनिक आत्ताच एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे विभागीय संपादक श्री अनिल राठोड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचं यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार श्री अनिल राठोड यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.

श्री अनिल राठोड गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून सलग तीन वर्षे उत्तम कामगिरी बजावली असल्याने संघटनेने त्यांना बढतीदेण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री अनिल राठोड संघाच्या नियमांचेअधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्नशील करणार आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष सचिन जाधव, पी जी कोटूरवार, पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले,

शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष लहुकुमार शिंदे, महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख

संतोष वाव्हळ, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार अॅड. अमोल सकट, अॅड. रत्नाकर पाटील, अॅड. जितेंद्र पाटील, अॅड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे,

महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक ३० जानेवारी २०२६ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
