हायवे लगत जमीन नसताना खोटे खरेदीखत केले ; मानवत न्यायाल याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत:- (दिनांक ०८ जानेवारी) हायवे लगत जमीन नसताना खोटे खरेदीखत केले. या प्रकरणी मानवत न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, मानवत न्यायालयात तक्रारदार नागनाथ कचरू जंगाले यांनी ॲड. सुनील जाधव यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये बाळासाहेब दत्तात्रय देशमुख यांनी त्यांची स्वतःची जमीन ही हायवे लगत नसताना सुद्धा साजिद अली मोहम्मद ताहेर अन्सारी, साजिद अली अब्दुल सलाम बेलदार बेलदार यांना शेत गट नंबर ५० मौजे खरबा येथील जमीन दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी खरेदीखत क्रमांक २२४०/२०२३ प्रमाणे खोटे व बनावट खरेदीखत करून दिले,

त्या मध्ये साक्षीदार म्हणून गोपाळ नारायण भिसे, मुस्तफा दादामियाँ शेख, ज्ञानोबा लक्ष्मण कच्छवे यांनी स्वाक्षरी केली आणि सर्वांनी जमीन हायवे लगत नसताना खोटे व बनावट खरेदीखत करून दिले त्या मुळे फिर्यादी यांची फसवणूक झाली म्हणून फिर्यादी नागनाथ कचरू जंगाले यांनी मानवत न्यायालयात तक्रार दाखल केल.

तसेच मानवत रेल्वे स्टेशनचा उड्डाणपूल झाल्यानंतर शासनाने अधिग्रहण केलेला पुरावा व बाळासाहेब व त्यांची आईची जमीन हाय वे लगत नसताना जाणून बुजून खोटे खरेदी खत करून दिले असा युक्तिवाद ग्राह्य धरुन मानवत न्यायाल याने पोलीस स्टेशन मानवत यांना गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी दिला.

मानवत न्यायालय यांनी ॲड. सुनील जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरील आरोपी विरुद्ध भा. द. वि. चे कलम ४२०, ४८७, १२० (ब ) ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला आहे. फिर्यादी यांच्यावतीने ॲड. सुनील जाधव यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संजयकुमार हजारे, ॲड. भूषण मोकाशे ॲड. श्याम कुऱ्हाडे यांनी सहकार्य केले.
