ताज्या बातम्यानिवडमहाराष्ट्रमानवत

भागीत्रा गवळी यांची आरोग्य सेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने सत्कार

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०९ जानेवारी)मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील भागीत्रा मुंजाभाऊ गवळी या विद्यार्थीनीची ०७ जानेवारी २०२५ रोजी आरोग्य सेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

घरची परिस्थिती हलाखीची असताना विदयार्थीनीने मेहनत करत यश मिळवले व पात्रुड – नित्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी एक जानेवारी २०२५ पासून आपल्या पदाचा पदभार स्विकारला असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कार्य सम्राट माधवराव गायकवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सहादूजी ठोंबरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, सत्यनारायण उनवणे, संघमित्रा अर्बन बँकेचे चेअरमन सुभाष घनघाव,

लवुळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच बालासाहेब शिंदे यांच्या सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!