उमरखेडकृषी धनताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक
उमरखेड येथे सूर्यवंशी बहुउद्देशीय संस्थेमार्फत वृक्षारोपण
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक ७ जानेवारी शहरातील संत गजानन वार्ड येथील ओपन स्पेस चा समाजाकरिता विविध उपक्रमासाठी उपयोग व्हावा.
या उद्देशाने श्री गजानन पाचकोरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून “झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्याचे कार्य स्व श्रीराम सूर्यवंशी बहुउद्देशीय संस्थेने केले आहे.

संस्थेमार्फत पर्यावरण शिक्षण काळाची गरज , वैश्विक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, पक्ष्यांचे महत्त्व निसर्गावर आधारित पोस्टर स्पर्धा मॉडेल मेकिंग स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जात आहे. याविषयी मार्गदर्शन केले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री किसन सूर्यवंशी सर संस्थेचे सदस्य नानाराव खापरे श्री दिलीप भाऊ शिंदे पर्यावरण मित्र दिनेश जाधव, संकेत खापरे, अथर्व खापरे उपस्थित होते.

