ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

सुरगाणा तालुक्यातील सरपंचांचे सिस्ट मंडळाने सीईओ आशिमा मित्तल यांची घेतली भेट

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

सुरगाणा (दि. ७ जानेवारी) नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालूक्यातील रोजगार हमीचे सार्वजनिक कामे यांना स्थगिती दिल्यामुळे सुरगाणा तालूका रोजगारा पासुन वंचीत राहणार हे सरपंच यांच्या लक्षात येताच समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे सी ई ओ आशिमा मित्तल मॅडम यांना तात्काल भेट घेतली.

सुरगाणा तालूका हा आकांक्षी तालूक्यात येत असल्याने त्या ठीकानची रोजगार हमीचे कामे बंद करू नये.

लोकांना रोजगार उपलब्ध करुण दयावा तसेच सी ई ओ मॅडमणे मिशन भगिरथ एक प्रयास ही पाणी साठवणसाठी सीमेंटी बंधारे बांधणे ग्रामपंचायती मध्ये कामे देऊन मोठे काम उभे केले आहे. त्याचा फायदा सुरगाणा तालूक्याला मोठया प्रमाणात झाल्यामुळे दूग्धसंकलण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

लोकांनारोजगार मिळत आहे सुरगाण्यामध्ये जास्त पाऊस पडतो त्या तालूक्यातील कामे बंद करू नये.यासाठी समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आज सीईओ मॅडमची भेट घेतली.

आशिमा मित्तल मॅडम यांनी तात्काळ सरपंचांच्या मागणीची दखल घेऊन बी डी ओ सुरगाणा पोतदार साहेब यांना कामे चालू ठेवण्याचे फोन वरून आदेश दिले.

यावेळी रोजगार हमीचे सर्व प्रमुख अधिकारी व उंबरठाणचे लोक नियुक्त सरपंच गिरीश गायकवाड, डोल्हाराचे सरपंच राजेंद्र गावित काठीपाडा सरपंच रोहिणी वाघेरे चिंचपाडा सरपंच रेखा चौधरी म्हैसखडक सरपंच तुकाराम देशमुख मांदा सरपंच तुळशिराम महाले माधव पवार आदिसह बरेच ग्रा प सदस्य उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!