खेळताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहर

जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये मानवत नगर परिषदेच्या संघास प्रथम पारितोषिक

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०५ जानेवारी) नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. रघुनाथजी गावडे जिल्हाधिकारी परभणी मा. श्री धैर्यशील जाधव, आयुक्त, महानगरपालिका परभणी, यांच्या हस्ते करण्यात आले होते. तीन दिवसीय चाललेल्या या स्पर्धांमध्ये वेगवेगळे खेळांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायत व महानगर पालिका यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मानवत नगर परिषद संघ आणि गंगाखेड नगर परिषद संघ यांच्यामध्ये झाला होता.

या अटी तटीच्या लढतीत मानवत नगरपरिषद संघाने ८२ जणांनी दणदणीत विजय मिळवला. या संघाचे कर्णधार कुशल नेतृत्व श्रीमती कोमल सावरे मुख्या धिकारी तथा प्रशासक नगर परिषद, मानवत यांनी केले.

संघातील सर्व खेळाडूंना विश्वासात घेत व प्रेरणा देत सर्व खेळाडूंच्या मदतीने कर्णधार यांनी विजय श्री खेचून आणला. ०८ षटकाच्या या सामन्यामध्ये सर्वप्रथम नाणेफेक जिंकून गंगाखेड नगर परिषद संघाने क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला.

सर्वप्रथम फलंदाजी करताना मानवत संघाने ०८ षटकामध्ये एकूण १२९ धावसंख्या उभारली. या धाव संख्येचा पाठलाग करत असताना गंगाखेड नगर परिषद संघ ४७ धाव संख्येपर्यंतच मजल मारू शकला.

मानवत नगरपरिषद संघाच्या खेळाडू मध्ये कर्णधार कोमल सावरे, पंकज पवार, सचिन सोनवणे, आलीम अन्सारी, संतोष खरात, महेश कदम, सय्यद अन्वर, शतानिक जोशी, प्रकाश हारकळ, मनमोहन बारहाते, संजय कुऱ्हाडे, राजेश भदर्गे,सागर गाडे, इत्यादी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत विजयश्री खेचून आणला.

याच बरोबर आज झालेल्या रस्सीखेच या स्पर्धेमध्ये सुद्धा मानवत नगरपरिषद संघाने सेलू नगरपरिषद संघास हरवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

यावेळी मानवत नगर परिषद संघाला सहाय्य करण्यासाठी भगवानराव शिंदे, भागवत भोसले, शतानिक जोशी, संतोष उन्हाळे, एम. डी.पठाण, हनुमंत बिडवे, भारत पवार, रामराव चव्हाण, बळीराम दहे, नारायण व्यवहारे, रवी दहे, सोनाजी काळे, शेख जावेद, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, संजय दवणे, शाम दहे, निवृत्ती लाड, वंदना इंगोले, सुनिता वाडकर, गफ्फार शेख इत्यादी कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!