वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्सहात साजरी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
परभणी (दिनांक ०४ जानेवारी)परभणी येथील वृदावन कॉलनी येथे ०३ जानेवारी रोजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने विद्येची जननी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर अनिता पांचाळ महिला उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले.

कार्यक्रमात सावित्रीमाईच्या जिवन कार्यावर स्वराज दिवके, मोनिका साबळे, साहिल साबळे, माला साळवे, महिला जिल्हा महासचिव, छाया खरात, महिला जिल्हाउपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता साळवे, महिला जिल्हाध्यक्ष होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवनंदा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन गोकर्णा कंकाळ यांनी केले कार्यक्रमास परिसरातील नगरातील महिला मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

