
(खोट्या तक्रारींची शहानिशा न करता गुन्हे दाखल करु नये, नागरिकांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन)
✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
पुसद:- (दिनांक ४ जानेवारी) शहरातील एका महिला शिक्षकेच्या खोट्या पोलिस तक्रारीने नागरिक त्रस्त झाले असुन लोकांशी रिलेशन निर्माण करणे नंतर अॅक्ट्रॉसिटी, विनयभंग सारख्या गंभीर गुन्ह्यात लोकांना अडकविण्याच्या धमक्या देणे,

ब्लॅकमेलींग करणे असा प्रकार सदर महिला शिक्षिकेकडुन केला जात असल्याची तक्रार सदर भागातील नागरिकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे. ते आपल्या निवेदनात म्हणतात की, आम्ही खालील सह्या करणारे नागरीक पुसद शहर व तालुक्यातील विविध भागातील रहीवाशी आहोत.

गेल्या दोन ते तिन वर्षापासुन सौ. वर्षा देवानंद बुरकुले व तिचा परिवार व नाते संबंधातील लोकांचा उपयोग घेऊन लोकांशी रिलेशन निर्माण – करणे नंतर अॅक्ट्रॉसीटी, विनयभंग या सारख्या गुन्ह्यात लोकांना अडकविण्याच्या धमक्या देणे नंतर मध्यस्थी मार्फत ब्लॅकमेलींग करून आर्थिक तडजोडीचे प्रयत्न करतात.


तडजोड नाही झाली तर अॅक्ट्रॉसीटी किंवा विनयभंग या सारख्या गुन्ह्यात अडकवितात. सदर महिला ही व्ही. डी. ओ. व फोटो काढून पुरावे गोळा करते. असे अनेक उदाहरणे देता येतील. दरम्यान २३.१२.२०२४ रोजी गणेश हरीभाऊ पावडे रा. पार्वतीनगर पुसद यांचे शेजारीच वर्षा देवानंद बुरकुले ही महिला त्यांच्या परिवारासह राहते.

लहाण मुलांच्या किरकोळ भांडणातुन गणेश पावडे व त्यांच्या परिवाहासह ७ जणांवर असेच गुन्हे वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आले.
सदर महिलेच्या या प्रकाराला नागरीक वारंवार बळी पडत असुन या भागातील रहिवाशी नागरीक सुध्दा या महिलाच्या कृत्याला त्रासले आहेत ज्या भागात सदर महिला राहते त्या भागातील नागरीक गुण्या गोविंदाने राहतात.

या भागात आज पर्यंत कोणतीही पोलीस तक्रार किवा कधीही पोलीस गाडी येत नसे. परंतु सदर महिला वाद घालून तक्रार करते.
वारंवार पोलीस गाडी बोलावित असल्याने परीसरातील नागरीक भयभित झाले आहेत. सदर महिला व तिचा परिवाराच्या या नियमीतकृत्यामुळे पुसद शहर व तालुक्यातील जातीय सलोख्याला गालबोट लागत आहे. हा प्रकार अशाच सुरु राहीला तर यातुन समाज समाजात तेढ निर्माण होऊन पुसदचे वातावरण दुषीत होऊ शकते.
करीता अशा लोकांच्या खोट्या तक्रारीवर कोणतीही शहानिशा न करता गुन्हे नोंद करण्यात येऊ नये सदर महिलेने यापुर्वी ७ ते ८ लोकांना अश्याच पध्दतीने फसवुण खोट्या तक्रारी केल्या असुन त्यांचेवर गुन्हे नोंद झाले आहेत. त्याचे कागदपत्रे अर्जासोचत सादर करीत आहोत.
या प्रकारामुळे सामान्य नागरीकांवरवारंवार होणारे अन्याय थांबवुन नागरीकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर राजु दुधे, प्रकाश वायकुळे, सोमेश्वर जाधव, करण ढेकळे, यश चौधरी, प्रकाश पानपट्टे, प्रविण कदम, गजानन काकडे, कैलास जळगांवकर, सुखदेव दुम्हारे, गिरीधर ठेंगे, निलेश देशमुख, शशांक गावंडे, नितीन पवार, पंजाबराव गावंडे, प्रभाकर टेटर, सागर डाके, गजानन निकस, राजेश पोपळघट, संतोष पांढरे, व्ही. सी. कांबळे, सचिन सुरोशे, सागर देशमुख, संदीप वाढवे, मधुकर बोंबले, चक्रधर मुळे, दिलीप बेद्रे पाटील, अॅड. भारत जाधव, विशाल घाडगे, सनी देशमुख, शिवाजीराव कदम, स्वप्नील मस्के, शुभम जांगीड, राम बाबर, सुभाष साळुंके, विजयप्रकाश अडकिने, शेखर नादरे, सचिन भिताडे, शराफत अली, खतीब, विजय बाबर, संजय दहिवाल, गजानन सुरोशे व करण पानपट्टे इत्यादी नागरिकांच्या सह्या आहेत.
