खेळताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहर

नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक ०३ जानेवारी)नगर विकास विभागाच्या वतीने नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांच्याकरता वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायती व महानगरपालिका यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परभणी येथे होत आहे सदरील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा. रघुनाथ गावडे जिल्हा धिकारी, व माननीय धैर्यशील जाधव आयुक्त मनपा यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंद उत्साह व खेळाडू वृत्ती निर्माण होण्यासाठी राज्यस्तरावरून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत नगरपरिषद मानवत संघाने परभणी महानगरपालिका संघास सर्वप्रथम फलंदाजी करून 17 रणाने पराभूत केले.

नगरपरिषद मानवत संघाचे कर्णधार श्रीमती कोमल सावरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून परभणी संघास हरविले.

नगरपरिषद मानवत संघाचे खेळाडू अलीम व पंकज पवार या दोघांनी सर्व प्रथम फलंदाजी करत चार षटकामध्ये 54 धावाचे लक्ष देऊन परभणी संघास तीन बाद 37 धाव संख्या उभारता आली. सुरुवाती पासूनच मानवत संघास एक हाती वर्चस्व मिळविता आले.

मानवत नगर परिषद संघाकडून खेळताना श्रीमती कोमल सावरे, सय्यद अन्वर, महेश कदम, सचिन सोनवणे, संतोष खरात, शेख वसीम, संजय कुऱ्हाडे, राजेश भदर्गे, सागर, इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.

संघाला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषद मानवत चे कर्मचारी अधिकारी यामध्ये, श्री भगवानराव शिंदे, भारत पवार, संतोष उन्हाळे, शतानिक जोशी, भोसले, हरकळ, एम.डी .पठाण, हनुमंत बिडवे, बळीराम दहे, मनमोहन बारहाते, मुंजाभाऊ डोळसे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!