Uncategorized

मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीचा वतीने सोमवारी तहसील कार्यालया समोर धरणे

शेतकरी

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०३ जानेवारी) पिक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी या मागणी मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने ०६ जानेवारी रोजी मानवत तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून दरम्यान आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी ग्रस्त नुकसान भरपाई खात्यात जमा झालेली नाही शेतकयांच्या खात्यावर, कापुस, सोयाबिन, तुरीचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा.

आणि K.Y.C केलेल्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई तात्काळ जमा करण्यात यावी. अतिवृष्टी ग्रसत शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करण्यात यावी.

आदी मागण्या यावेळी आंदोलना दरम्यान करण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे अवाहन मानवत तालुका शेतकरी स्काणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!