उमरखेडमहाराष्ट्रशहरसामाजिक
परभणी येथील संविधान अवमान प्रकरण ढाणकी – उमरखेड चर्मकार समाज बांधव तर्फे निषेध नोंदवला
उमरखेड
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक)


उमरखेड (दिनांक 17 डिसेंबर)परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चौकात संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने अवहेलना केली.आरोपीस कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी.



अशी मागणी तहसीलदार ऊमरखेड तहसील कार्यालय येथे आम्ही अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा ढाणकी उमरखेड तालुका समस्त चर्मकार समाज बांधव तर्फे निषेध करतो.सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा मृत्यू झाला त्यांच्या परीवारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.


निषेध निवेदन देतेवेळी उमरखेड तालुका अध्यक्ष गजानन नारायण वानखेडे, ढाणकी शहराध्यक्ष यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन मारोती सुरोशे,चेतन गजानन ईसाळकर, लहु कोरडे उपस्थित होते.

