परभणी येथील घटनेच्या निषधार्थ माहूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार मार्फत संविधान प्रेमी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर- परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा बहुजन आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ न्यायालयीन कस्टडीत शहीद झाला आहे. सदरचा मृत्यू संशयास्पद असल्याने सदर घटनेच्या आंबेडकरी व संविधानवादी जनतेच्या वतीने दि.१७ रोजी माहूर बंदची हाक दिली होती.

या बंदला माहूर येथील व्यापाऱ्यांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बंद १०० % यशस्वी झाला. यावेळी शहरातील डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथे संविधानवादी व लोकशाहीवादी नागरिक जमा झाले यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावे.

अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, एक कोटी रुपये मदत देवुन शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. सोमनाथ च्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी द्यावी.


अश्या मागण्याचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
यावेळी तहसीलदार किशोर यादव यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी प्रकाश गायकवाड, डॉ. निरंजन केशवे, जयकुमार अडकीने, रफिक भाई, मनोज कीर्तने, विजय भगत विशाल खरे, धीरज शेंडे, विनोद खुपसे, संजय बनसोडे,

कॉ. किशोर पवार, सिद्धार्थ तामगाडगे, ज्ञानेश्वर गुजलवार यांनी आंदोलन कर्त्यांच्या मागण्याबाबत मनोगत व्यक्त केले. निवेदनावर गोविंदराव मगरे, रेणुकादास वानखेडे,अनिल माडपेलीवार,अमृत जगताप महेंद्र वाघमारे, रणधीर पाटील, आकाश कांबळे, विक्रम राठोड, प्रमोद राठोड, राजू सौंदलकर, दीपक कांबळे, प्रमोद जमदाडे, समाधान कांबळे, प्रवीण बरडे,शंकर भालेराव कनिष्क वानखेडे, आदीसह संपूर्ण तालुका भरातील संविधानप्रेमी व लोकशाही वादी नागरिकांची उपस्थिती होती.
दरम्यान कोणतेही अनुचीत प्रक्रार घडू नयेत म्हणून पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, स.पो.नि. रमेश जाधवर, पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राम्हण पो.हे.कॉ. गंगाधर खामनकर, पो.कॉ.गजानन जाधव, व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने बंद शांततेत संपन्न झाला.
