दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक, होऊन तीन गंभीर जखमी
✒️मुख्य संपादक: बबलू भालेराव मो.9637107518✒️संपादक :सिद्धार्थ दिवेकर मो 9823995466
✒️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर:- दिनांक 5( डिसेंबर ) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माहूर घाटातील लिंबायत फाट्यावर 2 मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन 3 जण गंभीर जखमी झाल्याने अपघात पाहून नागरिकांनी त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता मनासन्न अवस्थेत असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले आहे.

सदरील घटना दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी घडली आहे. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मालवाडा घाटासमोर लिंबायत फाट्यावरील पेट्रोल पंपा समोरील वळणावर अर्धवट झालेल्या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून अनेक नागरिकांचा जागी तडफडून मृत्यू सुद्धा झाला आहे.

महामार्ग विभागाला अनेक वेळा सूचना करूनही त्यांनी येथे अपघात प्रवणस्थळाचा बोर्ड सुद्धा लावला नसल्याने काल 4 डिसेंबर रोजी पुन्हा मोटरसायकलची आमने-सामने-धडक होऊन मौजे लिंबायत येथील दोघेजण अत्यवस्थ तर आर्णी तालुक्यातील मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाल्याने तिघांनाही एकाच ॲम्बुलन्स मध्ये यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. लिंबायत येथील प्रतीक शाम लोखंडे ( वय 30) बळीराम दत्तात्रय जगताप ( वय 45 ) हे आपल्या मोटरसायकलने गावातून राष्ट्रीय महामार्गावर आले असता आर्णी वरून सारखंनिकडे जाणारे अशोक भगवान तांबे ( वय 20 ) राहणार भंडारी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांनी जोराची धडक दिल्याने दोन्ही मोटर सायकल स्वार महामार्गावर आधळले. झालेल्या अपघातात जगताप यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड तुटून बाहेर आले

तर लोखंडे यांच्याही उजव्या पायाचे हाड मोडून बाहेर निघाले आहे तर दोघांच्या डोक्याला जबर मार लागला आहे तांबे यांचेही पायाला गंभीर दुखापत होऊन नाका तोंडातून रक्त वाहू लागले रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघात पाहून तिघांनाही माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले होते वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बिपिन बाभळे डॉ. केशव शिंदे डॉ. आकाश जाधव निलेश भिलावेकर कनाके मुधाले जुडे कुदळे भोपळे आर डी केंद्रे यांनी तात्काळ प्रथमोपचार करून तिघांनाही 102 या ॲम्बुलन्स वाहनाने वाहन चालक आसिफ बेग यांच्यासोबत यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे सह पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास माहूर पोलीस करीत आहे.
