उमरखेडमहाराष्ट्र

ढगाळ वातावरणाने रब्बीतील हंगाम धोक्यातबदलाचा फटका मानवी आरोग्यालाही धोका

कृषी धन

उमरखेड दि.4: गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र ढगाळी वातावरण आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील कपाशीवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु सोयाबीनचे कापसाचे हळदीचे पाण्यामुळे झालेली प्रचंड नुकसान पंचनामाचे आदेश देऊन सरकारने आतापर्यंत शेतकऱ्याला कोणतीही मदत दिलेली नाही.

त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे.आधीच ते नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामावरमोठी भिस्त आहे. परंतु मागील चार दिवसांपासून ढगाळी वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे.

परिस्थिती चार दिवसांपासून अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकांवर कीड येण्याची शक्यता वाढली आहे.

Oplus_131072

वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. खोकला, सर्दी, घसा वळवळणे आदींसह अंगदुखीचे आजार वाढले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने दवाखान्यात मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!