ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसन्मान सत्कारसामाजिक

युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका तर्फे जागतिक महिला दिन साजरा

✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)

माहूर येथे जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका मार्फत शाळेचे महिला शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार समवेत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे व शाळेचे सचिव शितल भवरे तसेच तालुकाध्यक्ष अनिल माडपेलिवार, तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे, सदस्य सदानंद पुरी यांनी शाळेतील शिक्षिका व महिला वर्गांचा सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला शाळेचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांनी आपले महिला सशक्तीकरणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर महिला शिक्षक वृंदांमधून काही मनोगत व्यक्त करण्यात आले अध्यक्षीय समारोप गणेश कचकलवार साहेब यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!