नागरजवळा जि. प.शाळेचा वतीने लेझीम पथकाद्वारे छत्रपती शिवरायांना अभिवादन
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २० फेब्रुवारी) तालुक्यातील मौ. नागर जवळा जिल्हा परिषद शाळेचा वतीने १९ फेब्रुवारी रोजी मानवत येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव आयोजित शिवजयंती निमित्त शाळेचा वतीने लेझीम पथकाद्वारे रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स आणि गीता द्वारे शिवरायांना मानाचा मुजरा केला दैवत छत्रपती, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सवारी भवानी चौकामध्ये, आणि आम्ही शिवकन्या या गीतावर विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे नृत्य करून उपस्थित सर्व शिवभक्तांचे मन जिंकले.

या लेझीम पथकाला शाळेतील शिक्षक श्री. गुलाब लाड आणि श्री. सोनया कीर्तनकार यांनी मार्गदर्शन केले या लेझीम पथकात ओंकार होगे, शिवराज रासवे, पवन होगे, श्रीराम होगे, नवनाथ रासवे, सिद्धांत होगे, संदीप होगे, रूपाली रासवे, श्रद्धा वाघ, नम्रता होगे, प्रेरणा होगे, सुप्रिया होगे, गौरी होगे, विद्या भोंडवे, दिव्या होगे, दिव्या सरांडे यांच्या सह शाळेचा एकूण 65 विद्यार्थ्यांनी लेझीम पथकात सहभाग नोंदवला होता.

या लेझीम पथकाने उपस्थित सर्व शिव भक्तांचे विविध शिव गीते आणि लेझीम नृत्यद्वारे शिवरायांना अभिवादन करून मन जिंकले यावेळी मानवत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचा वतीने लेझीम पथकाचे अभिनंदन केले.
