उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

दुर्लक्ष:महावितरणकडून रोज 6 तासांचे लोडशेडिंग;

लोकप्रतिनिधींनी तातडीची बैठक घ्यावी गावठाण वीज फिडरचे काम अर्धवट

दिनांक 21 फेब्रुवारी उमरखेड तालुका महावितरण कंपनी कार्यालयाकडून मरसूळ-बेलखेडसह चार गावांचे वीज व्यवस्थापन एकत्रितपणे करण्यात आले आहे. मात्र येथील गावठाण फिडरचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने रोज येथे 6 तासांचे लोडशेडिंग करण्यात येत आहे.

याबाबत लोकप्रतिनिधींनी बैठक घेण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मरसूळ, बेलखेड या पाच जोडणी केलेल्या गावांची सहा तास वीज खंडित केली जाते. मरसूळ बेलखेड गावठाण फिडरचे काम सुमारे पाच सहा वर्षांपासून नियोजित मंजूर झाले आहे.

असे असताना महावितरण फक्त हजारो वीजग्राहकांची समज काढण्यासाठी अर्धवट अवस्थेत वीज पोल, काही ठिकाणी डीपी पोल तार ओढून संबंधित ठेकेदारांकडून सुरु असलेले काम बंद पाडले आहे. मरसूळ हे गाव आ. किसनराव वानखेडे यांचे असल्यानेलोकप्रतिनिधीच्या गावातच जनसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.महावितरणकडून लोडशेडिंग होत असल्याने अनेक विद्युत उपकरणे निकामी होत आहेत.

मरसूळ, बेलखेड, बारा, कुपटी आणि आमदरी या गावांना सुरळीतमरसूळ-बेलखेड फिडरला बारा गावांची जोडणीबारा, कुपटी हे दोन गावे यापूर्वी पोफाळी वीज सबस्टेशनअंतर्गत जोडणीत होते. त्या ठिकाणच्या अभियंत्यांनी या गावांची वीजसमस्या वारंवार वाढत असल्याने बारा गावे मरसूल-बेलखेड फिडरला जोडली होती.

ही बाब पोफाळी वीज सबस्टेशन दप्तरी नोंद आहे. या ठिकाणी मरसूल-बेलखेड अर्धवट फिडरचे काम पूर्ण होईपर्यंत 4 तासासाठी वीज जोडणी ठेवली, तर वीजसमस्या तात्पुरती सुरळीत होऊ शकते.

या बाबतीत महावितरने गांभीर्य घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते, अशी मागणीसुद्धा नागरिक करीत आहेत.कायम वीजपुरवठा होण्यासाठी 10वर्षापासून मंजूर असलेले 32 केव्ही वीज निर्माण केंद्र उभारणीचे काम जागाच मिळत नसल्याने खितपत पडले आहे. उमरखेड तालुका पुसद विभागाच्या उपअधीक्षक अभियंता चव्हाण यांच्या देखभालीमध्ये येत असून ही समस्याअभियंत्यांना माहीत असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी मरसूळ-बेलखेड गावठाण फिडर सिंगल फेजिंग यंत्रणा सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरत आहे.शेती सिंचन, पाणीपुरवठा आणि पीठगिरण्या श्री-फेजअभावी तर सिंगल फेज सुविधा मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान त्रस्त झाले आहे. नागरिकांना हक्काच्या वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने सर्वच गावचे नागरिक त्रस्त झाले आहेत. याविरोधात येथील सरपंच, तसेच नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

आ. वानखेडे यांनी वीज वितरण व्यवस्था कोडमडलेल्या अभियंत्यांची तातडीची आढावा बैठक घेऊन मरसूळ-बेलखेड वीज फिडरअंतर्गत चारही गावांना सुरळीत सिंगल फेज वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी वीजग्राहकांकडून केली जात आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!