उमरखेडताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळ

पुसद शहर हददीत भारतीय बनावटीचे 500/- रु दराच्या चलनी नोटा बनविणा-या टोळीचा पर्दाफाश..!

(चार इसमांना अटक करुन 1,91,624/- रु मुददेमाल जप्त)

(स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

यवतमाळ (दिनांक 7 जून) जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अ उघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद, अवैध शस्त्र तसेच बनावट चलनी नोटा याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिथा सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.

त्याच अनुषंगाने ते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 05/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पाहीजे आरोपी शोध, अउघड गुन्हे कारवाई करीता रात्री पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली कि,

नवीन पुसद येथील सोनू पाटील यांच्या भाडयाचे रुम मध्ये राजकुमार पारधी हा राहत असून त्याचेकडे काही संशयीत इसम आलेले असून ते 500/- रु दराच्या बनावट चलनी नोट तयार करित आहे.

अशी गोपनिय माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने कौशल्यपुर्वक नवीन पुसद येथील मिळालेल्या माहीच्या ठिकाणी जावून त्याचे घराच्या चारही बाजूने सापळा लावला असता एक इसम संशयीरित्या हालचाल करीत असतांना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार श्रावन पारधी रा.सावळी ता.मानोरा जि.वाशिम असे सांगून मी सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाडयाने राहत असल्याचे सांगितल्याने त्याचे समक्ष घरात प्रवेश केला,

असता घराच्या बेडरुम मध्ये 3 इसम गोल रिंगन करुन त्यांचे समोर व बाजूला 500/- रु दराच्या चलनी नोटा, दोन वर्तुळाकार काच, तसेच 500/- रुपयांचे नोटाचे आकारचे को-या कागदाचे बंडलच्या सहाव्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागदाच्या सहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवित असल्याचे दिसून आल्याने पंचा समक्ष त्याचे समोरील 500/- रु दराच्या नोटाची पडताळणी केली असता त्याचे ताब्यात एकूण 117 नोट 500/- रु दराच्या चलनी नोटाची प्रखर लाईटच्या उजेडात निरीक्षण केले असता,

त्यामध्ये 04 नोट बनावट असल्याचे दिसून आल्याने नमूद नामे-1) राजकुमार श्रावन पारधी रा. सावळी ता.मानोरा जि.वाशिम सध्या रा.नवीन पुसद ता.पुसद जि. यवतमाळ 2) तुकाराम दामाजी गुहाडे रा.हर्षी ता. पुसद जि. यवतमाळ 3) भाउसाहेब आनंदराव पतंगे रा. कोंडूर ता. कळमनुरी जि. हिंगोली 4) रामदास किसन भरकाडे रा.डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली असे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणावरुन नोटाचे आकारचे को-या कागदाचे बंडल, वेगवेगळया कंपनीचे केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटाचे आकाराचे काळपट कागद, 2 गोलाकार काच तसेच 500/- रु च्या 04 बनावट नोटा, तसेच 113 नोट 500/- रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा व इतर साहीत्य असे एकूण 1,89,624/- रु मुददेमाल ताब्यात घेतले आहे.यांच्या विरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी जे सा. (भा.पो.से) सा मा. पोलीस निरीक्षक शसतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/ सुभाष जाधव, पोहवा/ कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोहवा/तेजाब रणखांब, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!