भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यकरण व पुतळ्याच्या संक्षणासाठी
(भीम आर्मी कडून खासदार मा.संजयभाऊ देशमुख साहेब यांना निवेदन)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)
पुसद (दिनांक २९ जानेवारी) शहरामधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यकरण व पुर्णाकृती पुतळ्याचे संरक्षणासाठी कायमस्वरूपी २ पोलीस तैनात करण्यात यावे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा पुसद शहरामध्ये आहे. परंतु पुर्णाकृती पुतळ्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रम करण्यात आले आहे.

पुतळ्याच्या च्या बाजूला मुख्य बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात असते पंजाब मध्ये नुकत्याच घडलेल्या प्रकरणांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.

या पूर्ण बाबीचा विचार करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे.तसेच पुतळ्याचे सौंदर्यकरण व्हावे.अशी बरेच वर्षापासून संविधान प्रेमी व आंबेडकर आनुयायी यांची मागणी आहे.

तरी आपण याची तात्काळ दखल घेऊन या संबंधी पाठपुरावा करावा.तसेच सध्या देशभर विकृतबुद्धीचे लोक हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबन करताना दिसून येत आहे,
त्यासाठी सरकारने यासंबंधी कायदा करावा तसेच वाशिम व यवतमाळ जिल्ह्यामधील शहरात, गाव खेड्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे असतील त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे.

या सर्व मागणीचे निवेदन आज यवतमाळ वाशीम मतदारसंघाचे सन्माननीय खासदार संजयभाऊ देशमुख यांना भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव व भिम आर्मी युनिट कडून निवेदन देण्यात आले.
