ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

वझुर बु. ग्रामपंचायतीचा वतीने जिल्हा परिषद शाळेस विविध साहित्य भेट

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत (दिनांक २९ जानेवारी )मानवत तालुक्यातील मौ. वझुर बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेस विविध साहित्य भेट देण्यात आले.

शाळेस भेट स्वरूपात टी. व्ही. प्रिंटर झेरॉक्स मशीन, आँफिस कपाट, कंप्यूटर टेबल, खुर्ची, सतरंज्या, विद्यार्थी मँट, संच लेझीम, गार्डन पाईप, कचरा कुंडी, एल. ई. डी. लाईट, ढोल वाद्य, इत्यादी साहित्य जिल्हा परिषद शाळेस देण्यात आले.

यावेळी वझुर. बु. ग्रामपंचायतचा सरपंच श्रीमती. रेखाताई अशोकराव चव्हाण, उपसरपंच श्री. मनोज चव्हाण, शाळेचे मुख्यध्यापक श्री. झेलाजी काळे,

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शिवराज चव्हाण, उपाध्यक्ष श्री. सिध्देश्वर शिंदे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री. विजय वाघ, श्री. नागनाथ बोधने, श्री. अल्ताफ शेख, यांच्या सह बाळासाहेब चव्हाण, सतिश चव्हाण, विकास बलांडे, ग्रा. प. कर्मचारी शंकर चव्हाण, श्री राऊत व नागरिक उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!