Uncategorizedउमरखेडमहाराष्ट्रराजकिय

प्रा. अभय जोशी यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार

Oplus_131072

प्रा. अभय जोशी यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीरतालुका प्रतिनिधीउमरखेड, दि. १२: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली आहे.

येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात कार्यरत प्रा. अभय जोशी यांच्या शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात होणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानेसन्मान करण्यात येणार आहे. प्रा. अभय जोशी हे मागील २५ वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Oplus_131072

‘कातरवेळी’, ‘बाकी उरते शून्य’, हे कथासंग्रह, ‘सांज सावल्यांच्या प्रदेशात’ हा ललित लेख संग्रह, ‘मारव्यात डोकावताना’ हा समीक्षा ग्रंथ व मराठी कादंबरी-प्रवाह व समीक्षा हा सहसंपादक म्हणून समीक्षापर गौरव ग्रंथ ही साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे. राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षण, साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!