ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

कीर्तनकार परिवाराचे भावकी स्नेह मिलन मानवत येथे उत्सहात संपन्न

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे.

मानवत दि.२४ मार्च) समस्त कीर्तनकार परिवार भावकी स्नेह मिलन शहरातील अंधारवड मारुती मंदिर दिव्यानंद आश्रम या ठिकाणी रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला सदरील कार्यक्रमास हिंगोली वाशिम परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील समस्त कीर्तनकार परिवार उपस्थित होता.

सध्याच्या धावपळीच्या युगात नात्यातील दुरावा वाढत चालला आहे कीर्तनकार परिवाराने भेटीगाठी नातेसंबंध दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून भावकी स्नेह मिलनाचे आयोजन करून समाजात एक आगळा वेगळा आदर्श सुरू केला आहे

तसेच स्नेह मिलनात सामाजिक ऋण व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज मठ संस्थान साखरखेर्डा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होण्यासाठी असे स्नेह मिलन ही काळाची गरज आहे. असे मार्गदर्शन सद्गुरूंनी केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री. पंकज (भैय्या ) आंबेगावकर, सद्गुरु प्रभू चैतन्य महाराज दिव्यानंद आश्रम, सद्गुरु श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगावकर आणि सद्गुरु श्री विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज अष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळ सत्रात स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न झाला कौटुंबिक नाते दृढ होण्यासाठी, तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नवीन पिढीमध्ये नाते, आप्तेष्ट आणि भाऊबंद यांच्यात स्नेह निर्माण होण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत असे महामंडलेश्वर श्री. सद्गुरु मनीषानंद गुरुजी महाराज रूढी आश्रम यांनी समारोपात सांगितले.

स्नेह मिलनामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल सर्व गुरुवर्यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रवी सांभा या कीर्तनकार, मनोहर शामसुंदर कीर्तनकार, विजय ओंकार कीर्तनकार, विलास रामभाऊ मिटकरी, संजय श्यामसुंदर कीर्तनकार, सिद्धलिंग शिवलिंग कीर्तनकार, शंकर लक्ष्मण कीर्तनकार, अंकलेश्वर लक्ष्मण कीर्तनकार, कैलास मठपती, तुकाराम रुस्तमराव निर्वळ, भिकाय्या कीर्तनकार , मल्लिकार्जुन किर्तनकार, सुरेखा कीर्तनकार, राणी विजय कीर्तनकार, सीमा कीर्तनकार यांनी परिश्रम घेतले.

तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कन्हैया शिवलिंग कीर्तनकार यांनी केले तर आभार श्री विलास रामभाऊ मिटकरी यांनी मानले सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी आपल्या आशीर्वाचनातून या कार्यक्रमाची गरज व्यक्त करून पुढील वर्षी भावकी स्नेह मिलन जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मठ संस्थान साखरखेर्डा येथे घ्यावे असे निमंत्रण दिले.

आयोजन समितीने पुढील स्नेहमीलन साखरखेर्डा येथे घेण्यात येईल असे यावेळी सांगितले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!