खेळताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

कोल्हा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी सरस्वती राऊत हिची परभणी जिल्हा कबड्डी संघात निवड

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक 14 जून) तालुक्यातील मौ. कोल्हा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. सरस्वती राऊत हिची परभणी जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.

पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे दिनांक 14 जून ते 17 जून दरम्यान होणाऱ्या पहिल्या 18 वर्षातील मुलींच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्र.शाळा कोल्हा शाळेची विद्यार्थीनी कु.सरस्वती दिलीप राऊत या खेळाडूची परभणी जिल्हा कबड्डी संघात निवड झाली.

निवड झाल्या बद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेशरावजी वरपूडकर, सचिव मंगल पांडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप तांबे, केंद्र प्रमुख प्रकाश मोहकरे, गुलाब भिसे, क्रीडा संयोजक किशन भिसे, परमेश्वर भिसे, दिगंबर तारे, राजेश मोहकरे, सिद्धार्थ पंडित, सुरेश भिसे व कोल्हा गावातील क्रीडा प्रेमींनी तिचे अभिनंदन केले करून पुढील वाटचालीस विद्यार्थीनीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!