उमरखेड येथील आयटीया मध्ये महात्मा फुले डॉ.आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड या संस्थेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनियर विद्वान केवटे (शिव ,फुले ,शाहू ,आंबेडकर युवा व्याख्याते उमरखेड)हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महापुरुषांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी चे कार्य व योगदान यावर प्रमुख मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नरवाडे सर यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री डी. पी. पवार साहेब तसेच आनंद कुंभारे, निखिल परोपटे, शिंदे, भोसले, पाटील, गवई थोंबाळे ,निंबोळकर इंगोले, मयूर कुंभारे कदम सर निंबेकर मॅडम वाठोरे मॅडम नरवाडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे महापुरुषांना अभिवादन केले. तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक संदेश देणारी गीते सादर करून उपस्थितांना प्रभावी सामाजिक संदेश दिला.संस्थेतील इतर कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेऊन महामानवांचा जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.

