खेळताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसन्मान सत्कारसामाजिक

वाहुल दोंदल याने पटकावला यवतमाळ गॉट टॅलेंट २४ – २०२५ मध्ये प्रथम क्रमांक

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

यवतमाळ- उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दोंदल यांचा मुलगा वाहुल (शुभ्रूराजे) वय अवघे ७ वर्ष विश्वभारती विद्या मंदिर शाळेमध्ये शिकत असलेल्या वाहुल याने दि. ६ फेब्रुवारी ला जाजू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ६ ते ९ च्या खलील वयोगटात यवतमाळ जिल्हा गॉट टॅलेंट २४ – २०२५ मद्ये सहभागी होऊन आपले टॅलेंट दाखवले, निवड प्रक्रियेत वाहुलची निवड झाली होती,

शनिवार दि. ८ फेब्रुवारीला त्याचे (grand Finale) फायनल झाले, वाहुल ने गृप ब मध्ये ६ ते ९ च्या खलील वयोगटात वाहुल ने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची बाल शिवाजी भूमिका साकार करून शिवकालीन मर्दानी खेळ लाठीकाठी, तलवारबाजी दांडपट्टा व आगेचीकाठी इत्यादी कला कौशल्याचे प्रयोग दाखवून अनेक जिल्ह्यातील अनेक शाळेतील मुलान मध्ये प्रथम क्रमांक पटकावला,

आपल्या कलेचे प्रदर्शन करून उपस्थित पालकांना व प्रेक्षकांना बाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेचा विचारात भारावून टाकले. मिळवलेल्या यशा बद्दल सर्वत्र वाहुल (शुभ्रूराजे) याचे कौतुक होत आहे.

या विजयासाठी अथक प्ररिश्रम घेणारे वडील विनोद दोंदल, आई सौ.कीर्ती दोंदल, कमळआजी, बहीण काश्यपी दोंदल, भाऊ शौर्य दोंदल विजयाचे शिल्पकार प्रशिक्षक प्रितम सर सोनवणे शिकत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापिका, सौ. देशमुख मॅम, शाळेचे सचिव, वर्गशिक्षिका सौ.प्रिया पाटील, खेळ शिक्षक अमोल जयसिंगपूर, राहुल सर इत्यादी सर्व शिक्षक वृंद तसेच प्रशिक्षण वर्गातील सवंगडी वाहुल ला वेळोवेळी मार्गदर्शन करीत सहकार्य करीत राहतात.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!