अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

ढाणकी येथील अवैध वाळू वाहतूक घेतले ताब्यात

(गजानन सुरोशे मंडळ अधिकारी पुन्हा गर्जले.)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍🏻करण भरणे (ढाणकी प्रतिनिधी) मो.94218 47351

उमरखेड (दिनांक २३ जानेवारी) तालुक्यात अवैध वाळू माफियानी वाळू चोरीचा उद्रेक केला आहे. मनमानी राज असल्यासारखे रस्त्याने निष्काळजीपणाने हद्दपार झालेले वहान वाळू ने भरून रहदारी च्या ठिकाणी चालून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे लोक सोशिअल मीडिया वर व्यक्त करत होते.

याची दखल घेत उमरखेड चे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी अवैध वाळू माफियाचे धाबे दणानून सोडणारे गजानन सुरोशे मंडळ अधिकारी यांना आदेश देताच आपल्या कर्तव्याशी इमानदारी ठेवणारे गजानन सुरोशे मंडळ अधिकारी यांनी दिनांक 23/01/2025 रोजी मौजे ढाणकी येथे 9:50 रात्रीला टेम्पो वाहन अवैध रेती वाहतूक करताना सिने स्टाईल पाठलाग करुन पकडले आणि तहसील कार्यालय येथे लावले.

सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन सुरोशे मंडळ अधिकारी,पंजाब सानप संतोष जगताप, राजेश भंडारे, अक्षय शिंदे ग्राम महसूल अधिकारी ,सय्यद इबादुल्ला ,अभिलाष गायकवाड ,उदल राठोड महसूल सेवक यांनी संयुक्त कार्यवाही केली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!