स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे “संकल्प ग्राम विकास अभियान सप्ताह”संपन्न
उमरखेड तालुक्यातील

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)
उमरखेड (दिनांक २८ डिसेंबर) कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीपासुन ते स्व.प्राचार्य आप्पाजीराव कुर्मे यांच्या पुण्यतिथी पर्यन्त १३व्या वर्षी ७दिवस सलग विविध उपक्रमांने नागापूर येथे “संकल्प ग्राम विकास अभियान सप्ताह” संपन्न झाला.

पहिल्या दिवशी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी महाविद्यालय कुपटी येथील N.S.S.चे ६० विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी महास्वच्छता अभियान राबविले.
संध्या.राजीव गांधी भवनमध्ये ह.भ.प. यशवंत देशमुख (राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त) यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर किर्तन केले. दुसऱ्या दिवशी स्व.दादाराव पाटील माध्य.व उच्च माध्यमिक शाळा कुपटी येथील शिक्षक व १५० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी गांव पहाणीसाठी आले होते.

नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील डॉ.विशाल दवने यांच्या मार्गदर्शनात सर्व टीमने १६५ लोकांची सिकलसेल व आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. महिला तपासणीसाठी डॉ.चंदा डोंगे तालु.आरोग्य अधिकारी, डॉ.चिंचोलकर मॅडम, डॉ.वानखेडे , संबंधित A.N.M., आशा वर्कर व कर्मचारी उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्या.प्रकाश शिंदे सर व सतिश घोडके सर यांच्या मार्गदर्शनात १ ते ५ चे मुलेमुली,६ ते ८ चे मुलेमुली व ९ते १२ चे मुलेमुली यांची मॕराथाॕन स्पर्धा घेण्यात आली.नंतर नांदेड येथील नेत्ररोग तज्ञ डॉ.शैलेश बच्चेवार व डॉ.गजानन माने व त्यांच्या टीमने ६५ डोळ्यांच्या रोग्यांची तपासणी आधुनिक यंत्रसामुग्रीव्दारे केली.
चौथ्या दिवशी डॉ.गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात गावातील ६८ गाई, म्हशी,बक-या कुत्री या पशुपालनांची तपासणी करण्यात आली.नंतर पळशी येथील जनावरांचे आरोग्य केंद्रातील गावांच्या दुधाळ गाईंचे प्रदर्शन घेण्यात आले.
या प्रदर्शनासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.क्रांती काटोले मॅडम उपस्थित होते.
पशुपालकांना १४ हजार रुपयांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.याच दिवशी पुसद येथील गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयाच्या N.S.S.चे १०५ विद्यार्थी स्वाती वाठ मॅडम यांच्या मार्गदर्शनात आली त्यांनी मोक्षधामात केलेली विकासकामे, मुख्यमंत्री -स्वच्छ शाळा -सुंदर शाळा जिल्हा प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेला भेट,गांव पहाणी व निसर्गरम्य टेकडीवरील राजीव गांधी भवनला भेट.
पाचव्या दिवशी सकाळी उमरखेड येथील गोपीकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाच्या N.S.S. चे ६० विद्यार्थी प्राचार्य माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात व N.S.S.चे प्रमुख प्रा.लोनसने सरांच्या मार्गदर्शनात येऊन गांव पहाणी केली.

पुसद येथील म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी गावांतील विजेसंदर्भात समस्या व उपाय यांवर आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले.याच दिवशी मुळावा, तरोडा, कुपटी व मार्लेगांव केंद्रातील शिक्षकांनी पुरस्कार प्राप्त शाळेची पहाणी केली.
शिक्षकांना बालाजी कदम सरांनी कॉम्प्युटर लॅब ची माहिती दिली.१९० शिक्षकांची “शिक्षण परिषद” उमरखेड पं.स.चे गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड, संबंधित केंद्रप्रमुख यांच्या मार्गदर्शनात काळाची गरज ओळखून शैक्षणिक विषयावर चर्चा झाली नंतर शिक्षकांच्या कलागुणांचा कलाविष्कार कार्यक्रम सादर करण्यात आला.अनेक हौशी शिक्षकांनी सहभाग घेऊन आनंद घेतला.
सहाव्या दिवशी तालुक्यातील विकासासंदर्भात “सरपंच परिषद”घेण्यात आली.मधुकर मुंडे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी मार्गदर्शन केले. तसेच आकर्षक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व डॉ.विनय चव्हाण सर व संदीप कवडे सर यांच्या मार्गदर्शनात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

सातव्या दिवशी स्व.प्राचार्य आप्पारावजी कुर्मे यांची पुण्यतिथी संपन्न या समारोपीय कार्यक्रमाला उमरखेड विभागाचे नवनियुक्त आमदार किसनरावजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चितांगराव कदम सरांनी केले सुत्रसंचलन डॉ.अंबादास कदम व डॉ.विनय चव्हाण सरांनी केले. आनंदराव चिकणे, सुधाकर वानखेडे सर ,राणी पवार यांनी समोयचीत मार्गदर्शन केले.सप्त्यात घेतलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आमदारांच्या शुभहस्ते बक्षिसे देण्यात आली.
नर्मदाबाई कदम, ठमणूबाई आडे व केवळाबाई कदम ह्या वारल्यानंतर त्यांच्या परिवाराने तेरवी न करता १३ हजार रुपये शाळेला दिलेत त्या व्याजातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
या सप्त्यासाठी गोदाजी जाधव सरपंच, रोशन शहा ग्रामसेवक, किर्ती माखणे तलाठी,भगत मॅडम कृषी सहायक, आडे,शिलार जनमित्र ,बापूराव कुर्मे उपाध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, ज्योती कदम ग्रामपंचायत ऑपरेटर, प्रताप आडे रोजगार सेवक, मारुती ठेंगे ग्रामपंचायत सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर,बंडा कदम,जयवंता आडे,सविता कदम, गुलाब महाराज आडे अध्यक्ष तंटामुक्त समिती,निला जाधव, सुनंदा कानझोडे, मंजुळा हनवते, लताबाई जाधव, कौशीबाई राठोड,चतुरा जाधव,कवीता आडे, संदीप जाधव अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती,भुरा कदम व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
