उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

उमरखेड येथील सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी..!

(बुद्ध पौर्णिमेनिमित्त बनवलेल्या खिरचा सर्वांनी घेतला स्वाद होता.)

✍🏻 (सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सहसंपादक)

उमरखेड:- (दिनांक १४ मे) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वैशाखी बुद्ध पौर्णिमा या मंगलदिनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुम्बीवनी वनात झाला होता.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिनांक १२ मे २०२५ रोजी सायंकाळी ९ वाजता सम्यक बुद्ध विहार येथील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण महाउपासक शंकरराव दिवेकर (माजी सैनिक) उपासिका हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका) यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर लगेच उपस्थित महिलांनी पंचशील ध्वजगीत सादर करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

रात्री ८ वाजता “सामूहिक महावंदना” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार सुधाकरराव लोमटे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासकार डॉ.सुनील कवडे सर हे होते. डॉ.कवडे सर आणि लोमटे सर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्याबद्दल प्रकाश टाकून समस्त बौद्ध उपासक,उपासिका यांना अमूल्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी केले होते. रात्री ९ वाजता खीर वाटपाचा हे कार्यक्रम करण्यात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सर्व बौद्ध अनुयायांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बनवलेल्या खिरचा घेतला स्वाद ..!

यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!