उमरखेड शहरात ब्रॉयलर चिकन ३००रुपये किलो ज्यादा दराने विक्रीचा आरोप; जादा दर आकारणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची नागरिकांची मागणी!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)मो. ९८२३९९५४६६
उमरखेड : उमरखेड (दिनांक 5 जुलै) शहरात ब्रॉयलर चिकनची किरकोळ विक्री तब्बल ₹३०० प्रति किलो दराने होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, या संदर्भात संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शेजारील हैदराबाद तसेच यवतमाळ जिल्ह्यात चिकनचे दर तुलनेने कमी असताना उमरखेडमध्ये ग्राहकांकडून अधिक दर आकारले जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, हैदराबादमध्ये ब्रॉयलर चिकनचे दर साधारणपणे ₹१७० ते ₹२२० प्रति किलो, तर यवतमाळ जिल्ह्यात साधारण ₹१८० ते ₹२२० प्रति किलो दरम्यान असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत उमरखेडमध्ये ₹३०० प्रति किलो दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA), पशुसंवर्धन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच वजन व मापे विभाग यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवून चिकन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची तपासणी करावी, दरफलकाची पडताळणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी व नियमबाह्य प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




