अपराधअवैधक्राइम गुन्हाताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

सोशल मीडियावर बौद्ध समाजाचा अवमान; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी;आजाद समाज पार्टी (कां.) युवा यांचे पुसद शहर पोलीस ठाण्यात निवेदन..!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

पुसद – सोशल मीडियाचा वापर करून महार (बौद्ध) समाज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी तसेच “जय भीम” या अभिवादनाचा अवमान करत जातीय द्वेष पसरविणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आजाद समाज पार्टी (कां.), युवा च्या वतीने पुसद शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनानुसार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी रात्री १०.११ वाजता आरोपी रुपेश बोंबले यांच्या “SONU_PATIL_001” या इन्स्टाग्राम आयडीवरून झालेल्या Instagram LIVE दरम्यान आरोपी योगेश कल्याणकर यांनी महार (बौद्ध) समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि “जय भीम” या अभिवादनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह, जातीवाचक व चिथावणीखोर वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याचा जलद, निष्पक्ष व प्रभावी तपास करून आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच सोशल मीडियावर जातीय विद्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी सायबर यंत्रणेमार्फत विशेष देखरेख ठेवण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली.आजाद समाज पार्टी (कां.) पुसदने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला कायद्याच्या चौकटीत कठोर उत्तर देण्याची गरज असल्याचे नमूद केले. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी राजकुमार भगत आजाद समाज पार्टी का. युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ, विशाल डाके आजाद समाज पार्टी का. युवा जिल्हा महासचिव यवतमाळ, राहुल धुळे, अजय लोखंडे भीम आर्मी तालुका अध्यक्ष, वैभव सूर्यवंशी भीम आर्मी तालुका उपाध्यक्ष, आकाश चवरे, प्रसाद खंदारे, शुभम गवई, आकाश धुळे, वैभव खरतडे, तेजस बोखारे, सुमित आढाव, शांतिशील जाधव, संदेश कांबळे, राज कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button