Uncategorized

यूपीएससी,एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे स्मृतीशेष उमाजी मनवर यांच्या स्मरणार्थ दहा रुपये चे पुस्तके अभ्यासिकेला भेट

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

✒️ बबलू भालेराव मुख्य संपादक मो.9637107518

पुसद:- (दिनांक 31 ऑक्टोंबर) तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे काल कथित उमाजी धोंडीबा मनवर (शेंबाळपिंपरीकर) राहणार मुंबई यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय शेंबाळपिंपरी यांना यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा इत्यादी पुस्तके प्रशांत उमाजी मनवर, प्रवीण उमाजी मनवर यांच्याकडून भेट देण्यात आले.

भारतरत्न, बोधिसत्व,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संपूर्ण आंबेडकरी तरुणांचे भवितव्य अभ्यासातून उज्वल होण्यासाठी आणि यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन उच्चपद गठावे या हेतूने मनवर परिवाराकडून ही दहा हजार रुपयाची पुस्तके भेट देण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने गौतमभाऊ येवले (सामाजिक कार्यकर्ते नांदेड), रंगनाथ कांबळे माधव मनवर (वंचित बहुजन आघाडी, शेंबाळपिपरी), सुभाष मनवर, नामदेव मनवर,आशिष मनवर इत्यादी अनेक नवयुवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!