✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9823995466
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 8 डिसेंबर) येथे आज स्नेह संवाद मेळाव्यात तालुक्यातील जनसमुदाया यांच्या बरोबर काँग्रेस पक्षाचे उमरखेड विधानसभेचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी संवाद साधला.

यावेळी व्यासपीठावर उमरखेड महागांव विधानसभे मधील नेते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती. ती आज या स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली.

एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी तालुक्यातील जनतेने कायम साथ दिली आहे.आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कोणीही हलवू शकत नाही. काहीही झाले तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे.

मागील दोन वर्षात आपण उमरखेड व महागाव तालुक्याची ओळख बदलली आहे. सतत दंगली होणारा तालुका आपण सुसंस्कृत व संयमी बनवला.सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामे केली.यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही.

मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी धर्म, जाती, भेद निर्माण करत जनतेच्या मनात विष पेरले. आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या उभारीने जनतेत जाणार आहे.

तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही.यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही.पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद व मनभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे.


तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे. आपण तयार केलेला सुसंस्कृत तालुका व त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी आहे. असे प्रतिपादन यावेळी साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला हजारो जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.