www.google.comअपराधअवैधआर्थिकउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

“गावंडे महाविद्यालयात करिअर कट्टा प्रवेशपूर्व जागरूकता कार्यक्रम संपन्न”

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड – दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी गो. सी. गावंडे महाविद्यालयात “इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये समाविष्ट होणारी ऍक्टिव्हिटी “करिअर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम ” घेण्यात आला, याप्रसंगी विद्यार्थ्यांना करिअर डायरी व करिअर कट्टा अंतर्गत समाविष्ट उपक्रमाची माहिती देण्यात आली, कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. पी. वाय अनासाने, कार्यक्रम समन्वयक, प्रा. डॉ.एस. एम. चेडे, प्रा. डॉ. एम. एम. कल्याणकर, प्रा. डॉ. एस व्ही सुर्वे, प्रा. प्रणिता महतकर, श्री. गणेश क्षीरसागर व महाविद्यालयातील बी.सी.ए, बी.बी.ए व बी.एस्सी. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष चे जवळपास शंभर विद्यार्थी उपस्थित होते.करिअर कट्टा (Career Katta) हा उपक्रम महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र’ (MITSC) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्रातील तरुणांना स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन: स्पर्धा परीक्षांसाठी महागडे क्लासेस लावणे शक्य नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरात दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. कौशल्य विकास (Skill Development): विद्यार्थ्यांना केवळ पदवी शिक्षण न देता उद्योजकता आणि विविध क्षेत्रांतील कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. रोजगार निर्मिती: विद्यार्थ्यांना आयटी, बँकिंग, कॉर्पोरेट आणि शासकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती देणे. त्यासोबतच आय. ए. एस. आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सनदी अधिकारी (IAS, IPS, IFS इत्यादी) विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करतात, उद्योजक आपल्या भेटीला यात यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक विद्यार्थ्यांशी संवाद साधून नवीन व्यवसाय सुरू कसा करावा, स्टार्टअप्स आणि वित्तपुरवठा याबद्दल मार्गदर्शन करतात.

वृत्तपत्र वाचन आणि विश्लेषण, रोज सकाळी दररोजच्या चालू घडामोडींवर (Current Affairs) आणि महत्त्वाच्या बातम्यांच्या विश्लेषणावर आधारित मोफत सत्रे घेतली जातात. एड-ऑन कोर्सेस जसे डिजिटल मार्केटिंग, सायबर सिक्युरिटी, बिझनेस कम्युनिकेशन यांसारखे सर्टिफिकेट कोर्सेस अगदी माफक शुल्कात उपलब्ध करून दिले जातात. विविध कोर्सेस यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर अधिकृत प्रमाणपत्रे दिली जातात, ज्याचा फायदा बायोडाटा (Resume) मजबूत करण्यासाठी होतो.अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, कार्यशाळा व उद्योजकता मार्गदर्शन महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी संस्था तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button