उमरखेड तालुक्यातीलमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

देवसरकर कुटुंबाचा अनोखा शिव विवाह सोहळा सामाजिक ऋण म्हणून बामसेफ संघटनेला 60 हजार निधी दिलाआहे…

तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जुने ज्येष्ठ नेते कैलासवासी भाई डॉ.केशवराव देवसरकर यांचे चिरंजीव आणि बामसेफ चे महाराष्ट्र राज्य सदस्य शिवाजीराव देवसरकर व वर्षाताई देवसरकर यांनी आपल्या मुलाचा कुलदीप शिवाजीराव देवसरकर ह्यांचा विवाह कुठलेही कर्मकांड व अवास्तव खर्च न करता देशभरात बहुजन समाजातील अठरापगड जातींना जोडणारे बामसेफ ह्या संगठनेला ‘सामाजिक ऋण’ म्हणून 60 हजार रुपये जनआंदोलन निधी संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्याकडे सुपुर्द केला.

महापुरुषांच्या प्रतिमा,संतांच्या विचारांची मंगलाष्टके,ह्या सर्व गोष्टी यावेळी आकर्षणाचे कारण ठरल्या! वर चिरंजीव कुलदीप व वधू प्रेरणा यांनी यावेळी सामाजिक संकल्प ग्रहण केला.ह्या विवाहानंतर उमरखेड येथे स्वागत समारंभासाठी बामसेफ चे राष्ट्रिय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी ,”अशाच प्रकारे कर्मकांड टाळू, बहुजन समाजातील अठरापगड जातीतील लोकांनी महापुरुषांच्या विचारांनी विवाह विधी करीत अवास्तव खर्च टाळला पाहिजे”.

असे प्रतिपादन करीत कार्यक्रमाचे कौतुक केले.प्रकाशपाटिल देवसरकर, पांडुरंगपाटील देवसरकर,पंजाबराव पाटील देवसरकर,श्रीधर पाटील देवसरकर,यांच्याद्वारे वामन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चक्रधर पाटील देवसरकर राष्ट्रीय किसान मोर्चा यांनी केले प्रास्ताविक शिवाजीराव देवसरकर यांनी केले. यावेळी जिजाऊ वंदना वंदना डॉ. अभय देवसरकर यांनी केले,आभार प्रदर्शन प्रथमेश श्रीधरराव देवसरकर यांनी केले.

सदर कार्यक्रम घडवून आणण्याकरिता सुरेशराव गोरे नागेश चोपडे,धीरज वानखेडे नारायणराव लोणकर,विद्वान केवटे, कृष्णा पाटील चंद्रवंशी, बामसेफ व सहयोगी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तसेच देवसरकर परिवाराने परिश्रम घेतले.ह्यावेळी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button