www.google.comअपराधअवैधउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

साखरा व देवसरी येथे अवैध देशी व विदेशी दारु विक्री करणा-या इसमांवर कारवाई..!

🚨 [एकूण 23,270/- रुचा देशी-विदेशी दारु जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई..!]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सह) मो.9823995466

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 26/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले.

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, मौजे देवसरी व साखरा येथे अवैध देशी व विदेशी दारु विक्री होत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे देवसरी व साखरा येथे छापा कारवाई केली असता इसम नामे- 1) फकिरा मुकुंद दवणे रा.देवसरी ता.उमरखेड जि.यवतमाळ 2) शिवराम बाबुराव गंदेवार रा.साखरा ता.उमरखेड जि. यवतमाळ असे अवैध देशी व विदेशी दारु विक्री करीत असतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या एकूण 23,270/- रुचा मुददेमाल जप्त करुन त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 65 (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button