अपराधअवैधउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

ढाणकीत तलवारीसह तरूणाला अटक; शहरात धारदार शस्त्रांचे प्रमाण वाढल्याने ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ची मागणी!

🚨 [सहारा पार्क आणि मच्छी मार्केटमधील वादांमुळे नागरिक दहशतीत]

✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील फुलसावंगी फाट्यावर बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगणाऱ्या विजय जळबा कांबळे (वय २३, रा. हरदडा) या तरुणाला बिटरगाव पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. २२ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली, तरी या निमित्ताने ढाणकी शहर आणि परिसरात धारदार शस्त्रांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

सध्या ढाणकी शहर व परिसरात तलवार, खंजर, कोयता यांसारख्या जीवघेण्या शस्त्रांचा सुळसुळाट वाढल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ढाणकी शहरातील ‘सहारा पार्क’ आणि ‘मच्छी मार्केट’ परिसरात झालेले हिंसक वाद एखाद्याच्या जीवावर बेतणारे होते. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हेगारांवर बिटरगाव पोलीस ठाण्याचा व ठाणेदारांचा धाक कमी पडत असल्यामुळेच असे प्रकार उघडपणे घडत असल्याची संतप्त चर्चा नागरिकांमध्ये आहे.या पार्श्वभूमीवर, परिसरात शांतता राखण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या युवकांमध्ये कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी तातडीने ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ (सशस्त्र शोध मोहीम) राबवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

केवळ कारवाया न करता, तरुण पिढीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याविरोधात जनजागृती करण्याचीही सध्या तीव्र गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच वेसण घालावी, अशी मागणी ढाणकीवासीयांकडून केली जात आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button