अपराधअवैधक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

पांहडुळ शिवारातील वन्यजीव शिकार प्रकरणाचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

🚨 यवतमाळ:- टूबोर बंदुकीसह शिकारी जेरबंद; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

यवतमाळ/ महागाव – जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 22/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पाहीजे आरोपी शोध कामी पुसद उपविभाग पेट्रोलींग करीत असतांना नमूद पथकांस गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, मौजे काळी दौ गावच्या हददीत काळी दौलत शेतशिवार पेवठाना गावकडे जाणा-या रोड लगत चिंचेच्या झाडाखाली वन्यजिव शिकार करण्याच्या उददेशाने एक इसम टूबोर असलेली बंदूक घेवून थांबून आहे.

अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशा पथक तात्काळ पंचासह काळी दौलत गावच्या हददीत शेतशिवार पेवठाना गावकडे जाणा-या रोड लगत रवाना होवून नमूद पथकांने अतिशय शिताफिने बंदुकधारी इसमांस टूबोर बंदुकीसह ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद कलीम ऊर्फ काल्या सय्यद हाफिज वय 32 वर्ष, रा. काळी दौ ता. महागांव जि. यवतमाळ असे सांगितल्याने त्याचे ताब्यातून देशी बनावटीची टूबोर असलेली बंदुक एकूण किंमत 50,000/-रु माल मिळून आल्याने तो जप्त करुन त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता इसम नामे सय्यद कलीम ऊर्फ काल्या सय्यद हाफिज वय 32 वर्ष, रा.काळी दौ. ता. महागांव जि.यवतमाळ यांनी व त्याचे साथीदार असे मार्च महीन्यात मौजे पांहडुळ/ईजनी शेतशिवारात वन्यप्राणी निलगाय शिकार केल्याचे कबूल केल्याने वन अपराध पहिले प्रतिवृत्त क्रमांक/वर्ष 07346/01/2026 कदनांक 10/03/2026 भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9, 51 अन्वये दाखल गुन्हा उघड करुन नमूद इसम सय्यद कलीम ऊर्फ काल्या सय्यद हाफिज वय 32 वर्ष, रा.काळी दौ ता. महागांव जि. यवतमाळ व इतर एक यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button