अवैधउमरखेडउमरखेड तालुक्यातीलकृषी धनताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषसामाजिक

उत्खनन झालेल्या मुरुमाची बाजार मूल्याप्रमाणे रक्कम घ्यावी – शहाजी खडसे (माजी सभापती जिप)

[अन्यथा 6 मे रोजी एसडीओ कार्यालयासमोर अनुवाणी पायाने उभे राहून मून आंदोलन: शहाजी खडसे माजी आरोग्य व शिक्षण सभापती जी. प. यवतमाळ यांचा प्रशासनाला इशारा..!]

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड, यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी हातला शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील मुरुमाची उत्खनन केल्यानंतर शेतात काळी माती टाकून जमीन लेवल करून शेताबाहेर पाणी काढणे, या लेखी कराराप्रमाणे संबंधित कंपनी ठेकेदाराने काम केले नसल्याने केलेल्या उत्खननाची बाजार मूल्य प्रमाणे किंमत ठेकेदाराकडून वसूल करून घ्यावी..! अन्यथा दिनांक 6 मे रोजी उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील खुल्या जागेवर मी भर उन्हात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनवाणी उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा शहाजी खडसे यांनी प्रशासनाला हा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे,

वर्धा, यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामासाठी संबंधित रेल्वे ठेकेदाराने हातला शिवारातील शेत सर्वे नं.६५ क्षेत्र.४:८६हे आर या शेतातून मुरुमाचे उत्खनन करून नेण्यात आला मात्र ठेकेदाराने लेखी करारनाम्याप्रमाणे उत्खनन केल्याच्या बदल्यात शेतात काळी माती टाकने, जमीन लेवल करून जमीन लेवल करून शेताबाहेर पाणी काढले जाईल असे ठरलेले असताना संबंधित रेल्वे ठेकेदार १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री आपला साहित्य पसारा गुंडाळून पसार झाला त्याला अडीच महिने होत असताना शेतातील खरीप हंगाम पेरणीपूर्व तयारी करण्याची सर्वत्र लगबग सुरू असताना रेल्वे कंपनीच्या ठेकेदाराकडून दगा फटका झाल्याने शेतातून एटीएस मोजणी नुसार एकूण 48 हजार 950 ब्रास मुरूम उत्खननाची बाजार मूल्य प्रमाणे एकूण रक्कम मिळावी,

अन्यथा दिलेल्या उन्हाच्या तीव्रतेत अनवाणी पायाने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर खुल्या पटांगणात मौन आंदोलन छेडणार असल्याचा गंभीर इशारा अन्यायग्रस्त शेतकरी शहाजी खडसे, मुळावा यांनी लेखी नियोजनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!