50 हजार दे! तुझा भाऊ घेऊनजा..!

युवकाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांनी केला खुन झाल्याचा आरोप : ‘तुझा भाऊ माझ्या कडे आहे.त्याच्यावर असलेले पन्नास हजार रुपये तू मला आणून दे आणि तुझ्या भावाला घेऊन जा’ अशी धमकी एका युवकाच्या भावाला मुकादम यांनी दिली होती. त्या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला असून नातेवाईकांनी खुन झाल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.चुरमुरा येथील नंदकुमार नारायण काळे वय वर्ष ४२ ऊसतोड मजूर म्हणून मजुरीचे काम करीत होता. नंदकुमार नारायण काळे सदर युवकाने एका व्यक्तीकडून उसनवारी पैसे घेतले होते.

ते घेतलेले परत करण्याचा दाखला नारायण• सदर तक्रारीवर पोलीस प्रशासनाने निपक्षपाती चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी व बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख यांच्या हत्तेची पुनरावृत्ती उमरखेड तालुक्यात होऊ नये याकडे लक्ष देऊन मृतकाच्या परिवाराला न्याय द्यावा. असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी व्यक्त केले आहे.

याच्यामागे सदर व्यक्तीने लावल्याने पैशाच्या मोबदल्यात घराची जागा देण्याची सुद्धा कबूल झाला होता. तरी पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून नारायण यास धमकी देणारे फोन सातत्याने सुरू होते. तो गेल्या दोन दिवसांपासून घरी आलाच नाही.
युवकाला दोन-तीन दिवस कोंडून मारहाण घरचे व्यक्ती सदर मुकादमाचे पैसे परत करण्यास तयार झाले असताना सदर युवकाला दोन ते तीन दिवस दाबून ठेवत मारहाणी दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करून परिवारातील सदस्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे सदर लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून प्रेताचे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

नातेवाईकांची आक्रमक भूमिकासदर मृतकाच मृतदेह हे शासकीय रुग्णालय उमरखेडच्या आवारात ठेवत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सदर मृतकाचे शव विच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका परिवारातील सदस्यांनी घेतली असल्याने परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांचाळ हे करीत आहेत.

