उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

जमाअत ए इस्लामी हिंद चे आज (12 एप्रील ) ला सद्भावना ईद मिलन

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड : – हर्ष व उत्साहाची पर्वणी ईदुल फित्र – रमजान ईद (दानोत्सव) नुकतीच साजरी करण्यात आली .ईद चा हा आनंद देश बांधवा सोबत व्दिगुणीत व्हावा तसेच आपला देश विविध आस्था आणि धारणाचा देश आहे. सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची किमान माहिती असणे आवश्यक आहे.

कोणत्याही जाहिराती महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल शी संपर्क साधा.

राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, प्रेम, जातिय सलोखा, वृध्दिगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणुन जमाअत ए इस्लामी हिंद संघटने तर्फ दरवर्षी प्रमाणे सद्भावना ईद मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 12 एप्रिल रविवार ला सांयकाळी 7 वाजता. ठिकाण अनंतराव देवसरकर सभागृह, ढाणकी रोड, उमरखेड येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात वक्ते प्रा. सुहेल अमिर (जळगाव ) तर प्रमख अतिथी म्हणून भन्ते किर्ती बोधी (सम्यक बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड उमरखेड), अकील मिर्झा जिल्हा संघटन यवतमाळ ,शेख नईम ( माजी जिल्हाध्यक्ष पुसद ,हनुमंतराव गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी) ,विजय बेतेवाड (गट शिक्षण अधिकारी पंस), शंकर पांचाळ (ठाणेदार), शिवाजीराव वानखेडे (अध्यक्ष ,बार असोसिएशन उमरखेड न्यायालय) ,एस .पी . डोंगे (अधिक्षक रा . प्र . उत्तरवार उपजिल्हा रुग्णालय) ,डॉ . विवेक पत्रे (अध्यक्ष युथ फाँडेशन), डॉ फारूक अबरार अध्यक्ष एमपीजे), विजय रेघाटे (अध्यक्ष औदुंबर वृक्ष संवर्धन समिती,डॉ. आशिष खांबाळकर , सह धार्मिक ने त्यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्याला समाजातील सद्भावना व शांतता प्रिय नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटने चे अध्यक्ष काझी जहिरोदीन यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!