पुसदमध्ये ज्ञानाचा उत्सव भीम आर्मी ने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेचे केंद्र ठरले
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद; 2200 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम आर्मी – भारत एकता मिशन यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा – २०२६ ही परीक्षा पुसद येथे यशस्वीरीत्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या स्पर्धा परीक्षेत तब्बल २२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून परीक्षा ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच दिवशी पेपर व त्याच दिवशी निकाल व त्याच दिवशी बक्षीस वितरण सोहळा या पद्धतीने पारदर्शकपणे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षेत सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मोहिनीताई इंद्रनील नाईक नगराध्यक्ष न . प.पुसद या होत्या, तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सुनील खाडे अध्यक्ष धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोकराव भालेराव यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आशाताई साखरे (सरपंच, बोरगडी), विठ्ठल खडसे, शिक्षण सभापती न.प.पुसद, भारत कांबळे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुसद राजकुमार भगत, विशाल डाके, प्रा. प्रदीप धबाले, डॉ. राहुल भगत, अमोल खडसे, किशोर मुजमुले, शरद ढेंबरे, प्रफुल भालेराव, सुखदेव भगत, डॉ. प्रियंका खाडे, ॲड. अमोल भालेराव जितेंद्र कांबळे, रुखमण्णा बादावार, मारोती कोटरंगे, बिरकुरवार सर, राजेश अघम, ऋषी चौधरी, विश्वास भवरे, धनराज कांबळे, प्रफुल भालेराव, तायडे मॅडम, नेहा भगत,, सुरेश कांबळे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची आवड निर्माण करून देणे हा होता.


या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला.परीक्षा केंद्र संचालक म्हणून नरेंद्र दादाराव पाटील यांनी उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार राजकुमार भगत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम आर्मी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्व मित्र परिवारांनी अथक परिश्रम घेतले.यशस्वीपणे स्पर्धा परीक्षा संपन्न केल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
