उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

भीमजयंती निमित्ताने भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उमरखेड नगरपरिषद ने घेतला सौंदर्यकरणाचा आढावा!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

🚨(ॲड.संतोष जैन यांच्या सोबत विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.)

उमरखेड – येथील भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने उमरखेड नगरपालिकेने घेतला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सौंदर्य करण्याचा आढावा.

या मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला रंगरंगोटी करणे, हार घालण्यासाठी पायऱ्या तयार करणे, लाइटिंग आणि पाण्याच्या कारंजा नव्याने बसवणे, पुतळ्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी लाइटिंग व फुलाची सजावट करणे, सर्व परिसर स्वच्छ करणे, पुतळ्याच्या मागच्या बाजूला एक 10 बाय 12 ची स्टोअर रूम बांधणे, झाडांना मोठ्या कुंड्या बसवणे यांच्यासह सोई सुविधेसाठी इतरही कामे करण्याची यावेळी उपस्थित बांधवांनी नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचे प्रतिनिधी ॲड. संतोष जैन यांच्याकडे मागणी केली आहे.

यावेळी सुभाषराव दिवेकर (सेवानिवृत्त डीवायएसपी), नगरसेवक ॲड.बाळासाहेब नाईक, पी एल आठवले, सभापती रसूल पटेल, विरेंद्र खंदारे, राहुल काळबांडे, पत्रकार सतीश कोल्हे, अतुल पाईकराव, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, भीमराव सोनुले, यशवंत काळबांडे, उत्तम शिंगणकर, दत्ता शिनगारे, महामुने यांच्या सह नगर परिषदेचे इंजिनियर व कर्मचारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!