www.google.comताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळविशेषसन्मान सत्कारसामाजिक

पत्रकार राजेश ढोले यांना ज्ञानदीप गौरव पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित!

🚨(पुसदच्या सुपुत्राचा नाशिक ऐतिहासिक नगरीत सत्कार व गुणगौरव!)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 24 मार्च 2026 पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे म्हणून परिचित असलेले राजेश ढोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रोटरी हॉल, गंजमाळ नाशिक येथे ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले व सचिव मिलिंद कळवणकर, विलास पांगारकर, आयटकचे राजू देसले, आपलं महानगरचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रमणी पटाईत, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, पत्रकार पुढारी उपसंपादक जिजा दवंडे, शिवव्याख्याते सचिन देवरे, सुनंदा पाटील, नीलिमा साठे, रवींद्र गायकवाड, मदन बढे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजेश ढोले हे पत्रकारिता व सामाजिक कार्यकर्ते असून पत्रकारितेच्या माध्यमातून दिन दलित वंचित श्रमिक मजूर सामान्य माणसाचे प्रश्न मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करणारे तसेच सामाजिक व सांस्कृतिक व विविध क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी असल्याने त्यांच्या कार्याची दखल म्हणून नाशिक येथील रोटरी क्लब सभागृह गंजमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप पुरस्काराने त्यांचा गुणगौरव सन्मानपत्र ट्रॉफी व व अभिनंदन पत्र देऊन त्यांचा येथे सत्कार करण्यात आला आहे.

अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर, उपाध्यक्ष एम. डी. प्रताप, खजिनदार अनिल कळंके, गोपाल कदम, अशोक शिरसाठ, राजेंद्र देवळे, अॅड. वैशाली आढाव, प्रमिला मुदलीयर, आनंद दाभाडे, सुनील आठवले, पंकज पवार, सुशील गांगुर्डे, पराग आमले, गणेश वाडेकर, गणेश निकाळजे, मनोज मुंडे, सनी सूर्यवंशी, विवेक बनकर आदींनी परिश्रम घेतले.त्यांच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!