अपराधअवैधउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहर

तिन जिल्ह्यातुन तडीपार असणारा इसम फायटर घाव (चाकु) घेवुन फिरत होता

(डिटेक्शन ब्रँच (DB) उमरखेड यांची कारवाई)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – दि.22/03/2026 रोजी बॅच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे सोबत पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/1275 किरण राठोड, पोशि/2673 दिगांबर गिते डी बी पथक यांनी गुन्हेगारी शोध अवैध धंदे कारवाई पाहीजे असलेले आरोपी अवैध शस्त्र शोध घेणे कामी उमरखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, एक इसम ज्याने काळ्या रंगाचे टि-शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परीधान केलेली असुन त्याने कमरेला फायटर घाव लावुन जे के पाणि फिल्टर, तकीया कडुन ढाणकी रोड कडे येथे आहे,

वरुन नमुद पोलीस स्टाफ पंचासह गेलो असता जे के पाणी फिल्टर समोरुन मिळालेल्या नमुद वर्णनाचा इसम दिसल्याने आम्ही 21/45 वा. थांबवुन आमचा तसेच पंचाचा परिचय देवुन त्यास येथे येण्याचे कारण समजावुन सांगुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख शाहरुख रुस्तुम, वय-20 वर्ष, रा. डोंगरगाव गौल ता. महागाव ह.मु. तकीया उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ असे असल्याचे हेच संशयीत इसम असल्याचा खात्री झाल्याने आम्ही आमची व पंचाची अंगझडती देवुन सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक स्टिलचा फायटर घाव (चाकु) ज्याची एकुण मॅन सह लांबी 13 इंच, घाव ची एकुण लांबी 13 इंच, ज्याचा पाता मध्य भागी चार ठिकाणी छिद्र असलेला तसेच वरील बाजुस चार टोकदार खाचे असलेला त्याची लांबी 9 इंच व, पात्याची मध्यभागी रुंदी 1.8 इंच,, ज्याची मुठ फायटर सारखी सोनेरी रंगाची ज्याची लांबी 4 इंच, मॅनची एकुण लांबी 9 इंच व मॅनची मध्यभागी रुंदी 2 इंच कि.अं 500/- रुपये चा मुद्देमाल अवैधरित्या व विनापरवाना मिळुन आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले. यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 सह कलम 223 भा.न्या.स. अन्वये अप क्र. 208/2026 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे.

2) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत जाब देणार इसम नामे आरिशोद्दीन मो. तारकोद्दीन खतीब वय-23 वर्ष, रा. दादुमिया दर्गा जवळ आझाद वार्ड उमरखेड ता.उमरखेड यवतमाळ हा चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे केले असता त्याचे वर वेळो वेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याचे वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेड तडीपार प्रस्ताव क्र 02/2025 कलम 56 (1) (अ) म पो का अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे कडे सदर इसमाचा तडीपार प्रस्ताव पाठविला होता.दि.04/12/2025 रोजी उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांनी सदर इसमास एक (01) वर्षाकरीता यवतमाळ व जिल्ह्यालगतच्या नांदेड व वाशिम असे 03 जिल्याचे स्थळसिमेतुन हद्दीतुन तडीपार केले बाबतचा आदेश पारीत केला असता सुध्दा सदर हद्दपार तडीपार इसम हा उमरखेड शहरात येवुन मदीना पान शॉप, ढाणकी रोड येथे थांबुन असल्याची गोपनिय बातमी मिळताच

सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेवुन सदर तडीपार इसम नामे आरिशोद्दीन मो. तारकोद्दीन खतीब, वय-24 वर्ष, दादुमीया दर्गा जवळ आझाद वार्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ याने मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, उमरखेड यांचे उपरोक्त कर्यालयीन आदेशान्वये हद्दपार आदेश पारीत असतांना देखील नमुद कायदेशीर निर्देषाचे उल्लंघन केले व नियमीत हद्दपार कलमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांचेवर कलम 223 भारतीय न्याय संहिता, 2023 सह कलम 142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे अप क्र 207/2026 गुन्हा नोंद केला आहे. सदर इसमास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 टेंभरे, पोशि/1275 किरण राठोड, पोशि/2673 दिगांबर गिते यांनी सदर इसमास बाहेर जिल्ह्यात सोडण्याकरीता ताब्यात घेवुन पोहवा/2201 प्रकाश बोंबले यांनी सदर इसमास कळमनुरी जि. हिंगोली येथिल त्याचा मित्र नामे शेख समीर शेख कदीर, वय-24 वर्ष रा. बाळापुर जि. हिंगोली याचे कडे सोडण्यात आले आहे.

अवैध धंदे शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी तसेच इतर माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सह कार्य करावे ही विनंती.सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहका/2201 प्रकाश बोंबले, पोशि/1652 संघशिल टेंभरे, पोशि/1275 किरण राठोड, पोशि/2673 दिगांबर गिते, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!