ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियविशेषशहरसन्मान सत्कार

अशोकराव भालेराव यांची भीम आर्मी महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती..!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – आंबेडकरी चळवळीतील ज्वलंत व लढाऊ नेतृत्व म्हणून ओळख यवतमाळ व पुसद जिल्ह्यांमध्ये ओळख असलेले अन्याय अत्याचार पिडीतांना भारतीय संविधानाला डोळ्या समोर ठेऊन भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील असणारे अशोकराव भालेराव जिल्हाध्यक्ष भीम आर्मी यवतमाळ जिल्हा यांची त्यांच्या आज वरच्या सामाजिक संघर्षाची दखल घेऊन भीम आर्मी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. खासदार भाई चन्द्रशेखर आझाद व भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनी रतन सिंग यांच्या आदेशाने व भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मी भारत एकता मिशनच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीमुळे राज्यातील आंबेडकरी चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.अशोकराव भालेराव हे सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भीम आर्मीच्या नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात संघटन बळकट करून सामाजिक न्यायासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प अशोकराव भालेराव यांनी व्यक्त केला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!