बेलमंडळ (धम्मभूमी) हदगाव येथे 10 मार्च रोजी तिसरी बौद्ध धम्म परिषद आयोजित

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड – दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा आयोजित बेलमंडळ धम्मभूमी येथे तिसरी बौद्ध धम्म परिषद दहा मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष नांदेडचे आयुष्यमान गणपत गायकवाड सरचिटणीस उपा. दामोदर सरकटे व कोषाध्यक्ष आयु.सुभाष नरवाडे व आयु. भीमराव कांबळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, तर द्वितीय सत्रामध्ये परमपूज्य भिक्कू शीलरत्न थेरो सहयोग नगर नांदेड, गगनबोधी ( मुदखेड) व इतर भन्ते यांची धम्मदेशना होणार असून तृतीय सत्रा मध्ये सत्कार समारंभ व आयु.कांताबाई रमेश अहिरे( छ.संभाजी नगर)व आयु.लताताई पवार त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख वक्ते आयु.प्राध्यापक सुकुमार कांबळे सांगली यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व त्यानंतर बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम सायंकाळी सादर होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजल व कव्वाली सम्राट प्रकाशदीप वानखेडे (अमरावती) व त्यांचे सोबत कुमारी साक्षी वानखेडे यांचा बहारदार बौद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम या बौद्ध परिषदेमध्ये आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रम सकाळी 8.30 पासून सुरू होणार आहे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने बौद्ध उपासक व अनुयायाने उपस्थित राहण्याचे आवाहन उपासक आयु.एस.के.मुनेश्वर यांनी केले आहे.
