मेंडकी येथे कायदे विषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिर
✍🏻समाधान कांबळे (तालुका प्रतिनिधी माहूर)
माहूर (दिनांक 21 जुलै) तालुक्यातील ग्रामपंचायत मेंडकी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून व तालुका विधी सेवा प्राधिकरण माहूरचे वतीने कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच अशाबाई हातमोडे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माहूर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी प्रदीप मुरादे, माहूर न्यायालयाचे गोवंदे, विधी तज्ञ एडवोकेट दिनेश येवूतकर,एडवोकेट एस पी कांबळे नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे एडवोकेट प्रदीप चव्हाण, बीट जमादार गेडाम, पत्रकार पंडित धुप्पे, ग्रामसेवक जाधव, मुख्याध्यापक लासुरे, शिक्षक मुनेश्वर, सामाजिक कार्यकर्ता सोनू तोडसाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन एडवोकेट दिनेश येवूतकर, एडवोकेट प्रदीप चव्हाण, विस्ताराधिकारी प्रदीप मुरादे, पत्रकार पंडित धुप्पे, यांनी केले.

यावेळी गावातील धनलाल पवार, आश्रोबा चव्हाण, मोहन चव्हाण, बळवंत पवार, कुंदन पवार,प्रेम पवार, गायकवाड,मोरे,आनंद चव्हाण, मुरली पवार,वसंत चव्हाण, गौतम येरेकर,अशोक पवार, शिवदास चव्हाण, अनिल राठोड, प्रितीबाई राठोड यांच्यासह विद्यार्थी व गुरुजन वर्ग आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आभार व सूत्रसंचालन एडवोकेट प्रदीप चव्हाण यांनी केले.
