सणसवाडीत उत्साहाचे वातावरण: सौ. मोनिकाताई हारगुडे यांचा जंगी सत्कार
पुणे सणसवाडी (प्रतिनिधी): जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या सौ. मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांची पुणे जिल्हा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, सणसवाडी येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

हा सोहळा सनसवाडी विघ्नहर्ता तरुण मित्र मंडळ (साई वेदांत पार्क, सराटे वस्ती) यांच्या वतीने अत्यंत उत्साहात पार पडला.कर्तृत्वाचा यथोचित सन्मान*सौ. मोनिकाताई नवनाथ हरगुडे* यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे सणसवाडी आणि शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. ही निवड केवळ वैयक्तिक नसून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मिळालेली एक मोठी संधी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले होते.

तरुण मित्र मंडळाचा पुढाकारशिरूर विघ्नहर्ता तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि साई वेदांत पार्क परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. “आपल्या भागातील व्यक्ती जेव्हा जिल्ह्याच्या पातळीवर काम करते, तेव्हा तिचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशा भावना मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

