उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

मुळावा येथे अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद आयोजन!

🌹देश विदेशातील भिक्षु संघ उपस्थित राहणार

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड- भारतीय बौध्द ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या वतीने मुळावा येथे माघ पौर्णिमा बुध्दाब्द २५६९ रविवार दि ०१ फेब्रुवारी व ०२ फेब्रुवारी पासुन दोन दिवशीय अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तरी धम्म बांधवानी धम्म ज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.

महान कारूणिक भगवान बुद्धाने जो सुख , शांती व दु;ख मुक्तीचा मानतावादी धम्म दिला त्यांचे सर्वांना ज्ञान व्हावे करिता बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे या धम्म परिषदेत देश विदेशातील पू.भिक्षु , भिक्षुणी संघ ,श्रामणेर , श्रामणेरी व बौद्ध धम्माचे अभ्यासक उपास्थित राहुन धम्म देसना करणार आहेत.

२१ व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे अध्यक्ष पू भदन्त धम्मसेवकजी महास्थवीर, उद्घाघाटक पू भंदत अतुरलिय रतन थेरो ( श्रीलंका ) , ध्वजारोहण भदन्त ज्ञानज्योती महाथेरो (घुतांगधारी) ताडोबा , धम्मपरिषेदेचे वेळापत्र दि १ व २ फेब्रुवारी २०२६ दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषदेतील कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ५ ते ६ ध्यान साधना त्रिरत्न वंदना परित्राण पाठ,सकाळी ७ ते ८ पू. भिक्षु संघ (जलपान) सकाळी ९ धम्म ध्वजारोहण ,शिल ग्रहण ,त्रिरत्न वंदना ,परित्राण पाठ व धम्म देसना ,सकाळी ११ भिक्षु संघास भोजनदान व विश्रांती , दुपारी २ ते ६ धम्मदेसना धम्म देसना सायंकाळी ६ ते ७ विश्रांती रात्री ७ ते १० धम्म देसना वरील वेळापत्रका प्रमाणे दोन दिवस कार्यक्रम होतील,

बाहेर गावावरून आलेल्या धम्म बांधवांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणुन संस्थेद्वारा ना नफा ना तोटा या तत्वावर भोजन व चहा पानाची व्यवस्था करण्यात येईल धम्म परिषेदेला शुभ्र वस्त्र परिधान करुन यावे तरी धम्म बांधवानी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहुन धम्म ज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहान आयोजकांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!