ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रसामाजिक

सत्यशोधक युवा संघाचा वतीने परभणी येथे युवा परिषदेचे आयोजन

परभणी / प्रतिनिधी. प्रविण घागरे

परभणी येथे दिनांक २९ जून रोजी शहरातील कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात सत्यशोधक युवा संघाचा वतीने ‘युवा परिषदेचे ‘ आयोजन करण्यात आले आहे.

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त या परिषदे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावी परिक्षेतील उत्तीर्ण व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमारजी कांबळे हे राहणार आहेत तर उदघाट्क म्हणून परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. सदानंद भिसे राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणून अबोली हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदरोगतज्ज्ञ डॉ. अनिल कांबळे तर विशेष अतिथी म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव मा. अजयराव गव्हाणे यांची उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक युवा संघाचे अध्यक्ष मा. लखन चव्हाण हे उपस्थिती राहणार आहेत प्रमुख प्रवक्ते म्हणून सौ. नंदाताई लोखंडे,मा. राजेश उफाडे, मा. मल्हार कसबे यांचे, संवैधानिक हक्क अधिकरा प्रति युवकांनी जागृत राहून त्यांचे संरक्षण करण्यास सदैव तत्पर असावे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का म्हणाले ?,आरक्षण हे कुबड्या नसून प्रतिनिधीत्व आहे.

या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे आवाहन सत्यशोधक युवा संघाचा वतीने करण्यात आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!